चिमुकल्या भाच्यांसोबत प्राजक्ता माळीची टोटल धम्माल, पाहा Video

By  
on  

 सिनेमे , मालिका, ट्रॅव्हल शो आणि आता कॉमेडी रिएलिटी शोचं निवेदन या सर्वांमुळेच अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत चर्चेत असते. सोशल मिडीयावर ती नेहमीच आपले विविध अपडेट्स चाहत्यांशी शेअर करते. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या प्राजक्ताने नुकतंच आपल्या दोन चिमुकल्या भाच्यांसोबतच्या मस्तीचे काही क्षण शेअर केले आहेत. 

प्राजक्ताच्या दादा-वहिनीला दुस-यांदा कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण आहे. शिवप्रिया व याज्ञसेनी या दोन गोड भाच्यांसोबत प्राजक्ता सध्या धम्माल सुट्टी एन्जॉय करतेय. त्यांच्यासारखीच लहान होऊन ती मस्त झोके घेतेय. हा खास व्हिडीओसुध्दा तिने चाहत्यांशी सेअर केला आहे. ती लिहते, "पाऊस, वातावरण, जेवण, भाचरांचा सहवास.. सगळ कसं- छान छान छान छान"

 

 

प्राजक्ताने या गोड क्षणांचे फोटोसुध्दा चाहत्यांशी शेअर केले आहेत.  

 

प्राजक्ताच्या या व्हिडीओ आणि फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.  

Recommended

Loading...
Share