दामोदर पंत या नाटकाचं आणि भरत जाधव यांच्या वडिलांचं आहे खास कनेक्शन, वाचा सविस्तर

By  
on  

प्रेक्षकांना खळखळून हसण्यास भाग पाडणारं नाटक श्रीमंत दामोदर पंत. या नाटकात विजय चव्हाण आणि भरत जाधव या जोडीने धमाल उडवून दिली होती. साधा भोळा दामू आणि त्याच्या अंगात येत असलेल्या दामोदरपंतांची व्यक्तिरेखा भरत यांनी उत्तम साकारली होती. पण तुम्हाला माहिती आहे का भरत जाधव यांच्या वडिलांचं या नाटकाशी खास कनेक्शन आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

 

भरत यांनी नुकताच याबाबतचा खुलासा केला आहे. भरत म्हणतात, ‘श्रीमंत दामोदर पंत मध्ये दामूच्या आई वडिलांची जी नाव आहेत ती खऱ्या आयुष्यात माझ्या आई वडिलांची नावं आहेत. गणपतराव जाधव आणि शांताबाई जाधव. नाटकाचा पहिला प्रयोग बघितल्या नंतर वडिल म्हणाले "चांगला उद्धार करताय माझ्या नावाचा..!’ या नाटकावर बेतलेला याच नावाचा सिनेमाही आला होता.

Recommended

Loading...
Share