नऊवारी साडीत दिसल्या शेवंता फेम अपूर्वाच्या घायाळ करणा-या अदा

By  
on  

शेवंता म्हणून अवघ्या मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. रात्रीस खेळ चाले या मालिकेमुळे अपूर्वा प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून अपूर्वा नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. नानविविध  फोटोशूट पोस्ट करत ती चाहत्यांकडून वाहवा मिळवते. 

आत्तासुध्दा अपूर्वाने तिचे नऊवारी साडीतलं दिलखेचक फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलं आहे. 

 

 

भावाच्या लग्नासाठी अपूर्वाने ही खास पिवळ्या रंगाची जरी-काठाची नऊवारी साडी नेसली होती. या साडीत तिच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत. 

 

रात्रीस खेळ चाले -२ मध्ये भिवरी ही छोटी पण लक्षवेधी भूमिका साकारणारी ्अभिनेत्री दीक्षासुध्दा अपूर्वासोबत या लग्नसोहळ्यात हजर होती. दोघींनी हा झक्कास सेल्फीसुध्दा काढला आहे.  

 

अपूर्वाच्या सौंदूर्याचे असंख्य चाहते आहेत. तिचा नऊवारीतला हा साज पाहून चाहते घायाळ नाही झाले तरच नवल.  

Recommended

Loading...
Share