बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी या मराठी अभिनेत्रीचा जीव झाला येडापिसा, पाहा एअरपोर्टवरचा Video

By  
on  

माझ्या नव-याची बायको या मालिकेतील शनाया ही व्यक्तिरेखा साकारुन अभिनेत्री रसिका सुनील महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय. रसिका सोशल मिडीयावर सतत चर्चेत असते. आपले फोटोशूट, व्हिडीओज् ती चाहत्यांशी शेअर करत असते. पण नुकताच रसिकाचा एक हटके व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात ती एअर पोर्टवर कुणाला तरी न्यायला आलीय आणि त्या खास व्यक्तीला भेटण्यासाठी ती प्रचंड उतावीळ झालीय. हा व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून तिचा बॉयफ्रेंड आदित्य बिलागी आहे. 

लॉकडाऊनमुळे दोघंही एकमेकांना भेटू शकत नव्हते. आदित्य परदेशात होता तर रसिका भारतात. त्यामुळे ह्या कपलची लॉंग डिस्टन्स रिलेशनशीप सुरु आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

हा व्हिडीओ शेअर करताना रसिका म्हणते, ‘माझा डान्स मंकी आला आहे.’  रसिका आदित्यला आणण्यासाठी एअरपोर्टवर आली होती. त्याला पाहून तिचा आनंद गगनात मावत नव्हता. ती वेडीपिशी होऊन एअरपोर्टवरच नाचू लागली. आदित्यला पाहताच तिने त्याला घट्ट मिठी मारली. तो क्षण खुपच भावूक होता. आपल्या माणसाचा विरह सोसल्यानंतर त्याची झालेली भेट हे खुपच अविस्मरणीय असतो. दोघांचे हे क्षण कॅमे-यात अचूक कैद झाले आहेत. 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

यंदा नववर्षाचं स्वागत करताना रसिकाने मित्र आदित्य बिलागीसोबतचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला  होता. 

सोशल मिडीयावरुन रसिकाने आपण आदित्यला डेट करत असल्याची जाहिर कबुली दिली होती. 


 

Recommended

Loading...
Share