एक झोका ..! अभिनेत्री सोनाली कुलकर्णी करतेय मिनीमून एन्जॉय

By  
on  

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी मे महिन्यात फियान्से कुणाल बेनोडेकरसह लग्नबंधनात अडकली. दुबईत हे लग्न अगदीच मोजक्या चार-पाच लोकांच्या उपस्थितीत पार पडलं. सध्या कुणाल आणि सोनाली दुबईतच त्यांच्या फ्लॅटमध्ये रहातायत. या लॉकडाऊनच्या काळात बोहल्यावर चढलेली सोनाली पतीसोबत क्वालिटी टाईम एन्जॉय करतेय.

नुकतीच सोनाली ईस्ट आफ्रीका येथे पती कुणालसोबत व्हेकेशन एन्जॉय करतेय.तिथल्या रोमॅंटिक क्षणांचे काही फोटो सोनाली चाहत्यांशी  शेअर करते आहे. 

 

मस्त निळ्याशार समुद्राजवळच्या झाडावर सोनाली झोके घेत छान एन्जॉय करतेय. 

पती कुणालने सोनालीचे हे छान एन्जॉय करतानाचे क्षण कॅमे-यात कैद केले आहेत. 

 

सोनालीच्या मिनीमूनचे फोटो पाहून चाहते भलतेच खुश झाले आहेत आणि त्यांनी त्यावर लाईक्सचा वर्षाव केला आहे.  

Recommended

Loading...
Share