कातळवाडीच्या देसी गर्ल्सचा हा धमाकेदार व्हिडीओ पाहा

By  
on  

डॉ.अजितकुमार उर्फ देवी सिंगच्या मुसक्या आवळण्यासाठी एसीपी दिव्या मॅडमसोबतच कोर्टाच्या रणांगणात नेटाने लढा देण्यासाठी एडवोकेट. आर्या यांची एन्ट्री झाल्याने देवमाणूस मालिकेत अनेक उत्कंठावर्धक वळणं येत आहेत.
 

देवी सिंगला कसे त्याचे गुन्हे त्याच्याकडून कबूल करुन घ्यायचे आणि त्याला त्याची कशी कठोर शिक्षा होईल यासाठी आर्या एक जबाबदार वकील म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न करतेय. पण देवी सिंगला म्हणजे डॉ. अजितकुमारला या त्याच्या कुकर्मापासून वाचविणयासाठी डिंपल खुप मदत करतेय, तिला मोठी अभिनेत्री व्हायचंय त्यासाठी डॉक्टरच्या पैशांचा तिला उपयोग होणार आहे, म्हणूनच ती त्याला त्याच्या प्रत्येक षड्यंत्रात त्याची साथ देतेय. पण डिंपल व अजितकुमारचा प्रत्येक डाव दिव्या आणि आर्या हाणून पाडणार असंच दिसतंय. 

सध्या देवमाणूस मालिकेत डिंपल आणि वकील आर्या मॅडम या जरी एकमेकींविरोधात उभ्या ठाकल्या असल्या तरी प्रत्यक्षात ऑफस्क्रीन मात्र या दोघींची धम्माल सुरु असते. डिंपल साकारणारी अभिनेत्री अस्मिता देशमुख आणि वकील आर्या साकारणारी अभिनेत्री सोनाली पाटील यांनी ऑफस्क्रीन देसी गर्लवर जबरदस्त ताल धरलाय. त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव सुरु केलाय. 

कातळवाडीच्या या देसी गर्ल्सचा हा अंदाज चाहत्यांना खुपच आवडलाय. 
 

Recommended

Loading...
Share