‘जीव झाला येडापिसा’ फेम शिवा म्हणजे अशोक फळ देसाई आता नकारात्मक भूमिकेत

By  
on  

'जीव झाला येडापिसा' ही मालिका अजूनही प्रेक्षक विसरले नाहीत. या मालिकेतील शिवा हा कमी कालावधीतच प्रचंड लोकप्रिय झाला. अभिनेता अशोक फळ देसाई या भूमिकेत दिसला. शिवाचा फिटनेस त्याची बोलण्याची लकब ही प्रेक्षकांना प्रचंड आवडली. अशोकची ही पहिलीच मालिका होती. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by tellyyapa (@tellyyapa9)

 

या मालिकेने काही दिवसांपुर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेनंतर अशोक एका हिंदी मालिकेत झळकतो आहे. सोशल मिडियावरील एका पोस्टमधून हे समोर आलं आहे. ‘मेहंदी है रचनेवाली’ असं या मालिकेचं नाव आहे. यात तो नायिका पल्लवीच्या पुर्वाश्रमीच्या पतीच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे त्याची या मालिकेत नकारात्मक भूमिका आहे. आता चाहत्यांना ही भूमिका कितपत आवडते हे लवकरच समजेल.

Recommended

Loading...
Share