Throwback Tuesday मध्ये पुष्कर जोगने शेअर केली ही खास आठवण

By  
on  

पुष्कर जोग ती & ती सिनेमात दिसला होता. त्याच्यासोबत या सिनेमात प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी दिसल्या होत्या. प्रेमाचा लव्ह ट्रँगल, एक आगळीवेगळी इंटरेस्टिंग स्टोरी आणि त्याचसोबतीला सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांची होणारी लंडन सफारी या सर्व गोष्टींमुळे पुष्की उर्फ पुष्कर जोग, प्रार्थना बेहरेआणि सोनाली कुलकर्णी यांच्या फॅन्सना देखील ‘ती & ती’ हा सिनेमा पसंत पडला.

 

 

या सिनेमाची खास आठवण पुष्करने शेअर केली आहे. तो म्हणतो, ‘ 2 वर्षांपुर्वी याच दिवशी मला झी टॉकीज कॉमेडी अ‍ॅवॉर्ड्सचा बेस्ट अ‍ॅक्टर अ‍ॅवॉर्ड मिळाला होता. मी माझ्या पद्धतीने संघर्ष करतो आहे. माझ्यावर कुणीच विश्वास ठेवला नाही. मी संघर्ष सोडणार नाही. मी माझं 1000% देईन. हार्ड वर्क हे महत्वाचं आहे.’ पुष्कर यापुर्वी वेल डन बेबी सिनेमात दिसला होता.

Recommended

Loading...
Share