चिंब भिजलेले...! हॅण्डसम हंक भूषण प्रधानचं लेटेस्ट फोटोशूट होतंय व्हायरल

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील हँडसम अभिनेता आणि तरुणींच्या गळ्यातला ताईत म्हणजे अभिनेता भूषण प्रधान. लुक्स आणि अभिनयाच्या जोरावर भूषणने सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं आहे. मालिका असो सिनेमे किंवा मग वेबसिरीज प्रत्येक माध्यमांतून भूषण आपला ठसा उमटवतो. लवकरच भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकतोय. महाराजांच्या व्यक्तिरेखेत तो हुबेहुब आणि रुबाबदार दिसतोय. जय भवानी य शिवाजी ही ऐतिहासिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते. पण त्यापूर्वीच भूषण सोशल मिडीयावरुन त्याचे काही लेटेस्ट फोटोशूट चाहत्यांशी शेअर करतोय. 

 

ब्लॅक आणि व्हाईटमधलं व शॉवरखाली आंघोळ करतानाच्या थीमचं हे हटके फोटोशूट भूषणने केलं आहे. पण इतकंच नव्हे तर प्रत्येक फोटोसोबत त्याने एक मार्मिक संदेशसुध्दा दिला आहे.  

 

भूषण म्हणतो, आंघोळ करताना कोणीतरी गातं किंवा मग आंघोळच करतं,पण बहुतांश लोक आयुष्याचे मोठे निर्णय हे शॉवर घेतनाच करतात.  

 

ताण आणि सर्व नकारात्मक विचार शॉवर घेतो तसे काढून टाका  आणि सकारात्मक राहा असा महत्त्वपूर्ण संदेश भूषणच्या या फोटोतून त्याने दिला आहे, 

Recommended

Loading...
Share