By  
on  

सचिन पिळगावकर यांना रात्री 2 वाजता दिलीप कुमार यांचा फोन येतो आणि....

आज दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप यांना आज सोशल मिडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. हरहुन्नरी अभिनेता सचिन पिळगावकर यांनी दिलीप कुमार यांची आठवण शेअर केली आहे. सचिन आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘लेजंड युसुफ साहब. खुप मोठी आहे. त्यांनी 100 वर्षं जगावं अशी प्रत्येकाचीच इच्छा होती. माझ्या संवेदना सायरा आपांसोबत आहेत. या सगळ्यात काळात त्या खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. 

 

 

‘दास्तान’ या सिनेमात मी त्यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. तर ‘बैराग’ या सिनेमात त्यांनी माझ्या वडिलांची भूमिका साकारली होती. 1976 च्या फिल्मफेअरमध्ये मी परफॉर्मन्स केला होता. त्या रात्री 2 वाजता मला त्यांचा फोन आला होता. ‘तुम अपने डान्स के लिए जाने जाओगे’ असं म्हणत त्यांनी माझ्या डान्सचं कौतुक केलं. 2005मध्ये ‘नच बलिये’ जिंकल्यावर मला त्यांच्या विधानाची प्रकर्षाने आठवण आली होती.’

Author

Recommended

PeepingMoon Exclusive