लेकासोबत किशोरी शहाणे थिरकल्या या गाण्यावर, चाहते म्हणाले क्या बात है......

By  
on  

अनेक सिनेमा, मालिका आणि रिअ‍ॅलिटी शोमधून किशोरी यांनी स्वत: ची खास ओळख केली आहे. या सगळ्या पलीकडेही किशोरी यांची ओळख आहे ती सुपरफिट अभिनेत्री म्हणून. किशोरी यांचा वावर कायमच एनर्जेटिक असतो. अभिनयासोबतच डान्स व इतर उप्रक्रमांमधला त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो. त्या सोशल मिडियावर अनेकदा डान्सचे व्हिडियो शेअर करत असतात.

 

 

आताही त्यांनी असाच एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये त्या लेक बॉबीसोबत थिरकताना दिसत आहेत.  कभी खुशी कभी गम या गाण्यातील यु आर माय सोनिया या गाण्यावर हे दोघंही थिरकताना दिसत आहेत. मुलाच्या एनर्जीला मॅच करत उत्साहाने डान्स करत असलेल्या किशोरींचं नेटिझन्सही कौतुक करत आहेत.

Recommended

Loading...
Share