बॉलिवूड चे प्रख्यात सिनेमॅटोग्राफर कबीर लाल ज्यांनी आज पर्यंत ताल , परदेस , कहो ना प्यार है , वेल कम बॅक इत्यादी सारख्या अनेक हिंदी चित्रपटांच्या सिनेमॅटोग्राफी ची धुरा यशस्वी पणे सांभाळली आहे आणि आता ते प्रथमच दिग्दर्शन करत असून त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला मराठी चित्रपट अदृश्य लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे . अदृश्य हा थ्रिलर मराठी चित्रपट असून प्रमुख भूमिकेत पुष्कर जोग ,मंजिरी फडणीस आणि एका महत्वपूर्ण भूमिकेत रितेश देशमुख आहेत .
विशेष बाब म्हणजे कबीर लाल आणि रितेश देशमुख २० वर्षानंतर पहिल्यांदा काम करत आहेत , रितेश चा पहिला सिनेमा तुझे मेरी कसम चे सिनेमॅटोग्राफर कबीर लाल हे होते या विषयी रितेश म्हणतो मी चित्रपटांत काम करतो याचे कारण कबीर लाल हेच आहेत ... सुभाष घई यांच्या चित्रपटाच्या सेट वर शूटिंग बघायला मी गेलो होतो त्यावेळेस माझी आणि कबीर लाल यांची भेट झाली कदाचित त्यावेळीच त्यांना असे वाटले असेल कि मला ऍक्टर बनायचे आहे , पुढे तुझे मेरी कसम चित्रपटासाठी त्यांनी माझे नाव सुचवले आणि त्याच फिल्म ने माझ्या फिल्मी करिअर ला सुरवात झाली ...
रितेश पुढे म्हणतो २० वर्षांनंतर पुन्हा एकदा कबीर लाल यांच्या सोबत काम करतांना मला खूप छान वाटत आहे आणि ते मराठी फिल्म चे दिग्दर्शन करत आहेत आणि त्याचा मी भाग आहे हि गोष्ट माझ्या साठी अत्यंत आनंदाची बाब आहे .
पुष्कर जोग आणि मंजरी फडणीस यांच्या सह सौरभ गोखले , अजय कुमार सिंह , अनंत जोग हे अभिनेते या चित्रपटात आहेत . साहिद लाल यांनी या चित्रपटाच्या सिनेमॅट्रोग्राफीची धुरा सांभाळली आहे , लवली वर्ल्ड एंटरटेनमेंट या बॅनर खाली चित्रपटाची निर्मिती अजय कुमार सिंह यांनी केली आहे
.
चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली असून लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल .