प्रसिद्ध गायक महेश काळे यांचा चाहता वर्ग मोठा आहे. फक्त देशातच नाही तर परदेशातही महेश यांचे फॅन्स आहेत. महेश यांनी नुकतीच एक वाईट बातमी शेअर केली आहे. महेश यांना पितृशोकाला सामोरं जावं लागलं आहे. महेश यांचे वडिल मुकुंद काळे यांचं निधन झालं आहे. महेश यांनी भावनिक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
महेश आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘जेव्हा तुम्हाला नमस्कार करायचो असं वाटायाचं देव भेटतोय, आता त्याला नमस्कार करीन, तेव्हा वाटेल तुम्हाला भेटतोय. सदा माझे डोला जडो तुझी मूर्ति’ . यासोबतच महेश यांनी वडिलांसोबतचे अनेक फोटोही पोस्ट केले आहेत.