अभिनेता श्रेयस तळपदेचं छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन, पाहा प्रोमो

By  
on  

मराठी मालिका, नाटक आणि सिनेमामंधून रसिक प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर अभेनता श्रेयस तळपदेने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. इक्बाल, गोलमाल, ओम शांती ओम यांसारख्या सुपरहिट सिनेमांमधून श्रेयसने हिंदीतही छाप पाडली. 
 

आता लॉकडाऊननंतर अनेक मोठमोठे कलाकार हे छोट्या पडद्याकडे वळतायत. छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करण्याचा जणू टर्डच रुजू होतंय. त्यात आता श्रेयसही स्वार होतोय. अनेक वर्षांनतर श्रेयस पुन्हा मालिका विश्वात परततोय. त्याचीच ही झलक नुकतीच झी मराठी वाहिनीच्या सोशल मिडीया पेजवर पाहायला मिळीली.

तुझी माझी रेशीमगाठ या नव्या मालिकेतून श्रेयस प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, ही एक प्रेमकथा असल्याचं प्रोमोवरुन लक्षात येतं. या प्रोमोत श्रेयससोबत असलेली गोड चिमुकली लक्ष वेधून घेतेय. सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होणारी ही गोड मायरा ह्या मालिकेद्वारे बालकलाकार म्हणून पदार्पण करतेय, हा प्रोमो खुपच क्युट आहे. 


 

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. झी मराठीच्या इन्स्ट्राग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओवर अभिनेता अंकुश चौधरीने देखील कमेंट करत श्रेयसला शुभेच्छा दिल्या आहेत. तसचं या चिमुकलीचंही कौतुक केलंय. “वाह वाह श्रेयस. अभिनंदन मित्रा. आणि ती मुलगी किती गोड आहे. कमाल..” अशी कमेंट अंकुश चौधरीने केली आहे.

‘आभाळमाया’, ‘दामिनी’ ‘अवांतिका’ मराठी यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून श्रेयसने सुरुवातीच्या काळातच आपली ओळख निर्माण केली होती. त्यानंतर हिंदी मालिकांसोबतच तो ‘सावरखेड’, ‘आईशप्पथ’ या मराठी सिनेमांमधून झळकला. 2005 सालामध्ये आलेल्या ‘इक्बाल’ सिनेमातून श्रेयसने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

Recommended

Loading...
Share