प्रकृतीच्या कारणामुळे घराबाहेर आलेली सदस्य शिवलीला पाटील हिने सदस्यांसाठी एक बाईट दिला होता. यावेळी घरातून प्रकृतीच्या कारणामुळे शिवलीला पाटील घराबाहेर आल्या होत्या. मुळात शिवलीला बिग बॉसच्या घरात गेल्या यावरुन त्यांच्यावर टीका झाली होती. पण बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच शिवलीला यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे.
एबीपी माझा या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवलीला यांनी भावनांना वाट करुन दिली आहे. शिवलीला आपल्या मुलाखतीमध्ये म्हणतात, ‘ मी बिग बॉसमध्ये गेल्याने वारकरी संप्रदाय आणि ज्येष्ठ मंडळी नाराज झाल्याने मी माथा टेकवून त्यांचीमाफी मागते. या शोच्या माध्यमातून माझे विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस होता.
महाराष्ट्राची संस्कृती, वारकरी संप्रदाय, कीर्तन परंपरा याविषयी प्रेक्षकांचे प्रबोधन करावे याच हेतूने मी बिग बॉस मराठी च्या घरात गेले होते. मी एका गाण्यावर नाचले म्हणून माझ्यावर सोशल मिडियातून टीका करण्यात आली. पण त्यातील एक गाणे विठुरायाच्या वारीचे होते तर दुसरे गाणे देवी तुळजा भवानीचे होते. इतर कोणत्याही हिंदी गाण्यावर मी नृत्य केलं नाही.’ ही सफाई देत शिवलीला यांनी आपली सफाई मांडली आहे.