‘होणार सुन मी या घरची’, ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. या मालिकेनंतर तेजश्रीने नाटक आणि मराठी सिनेमातून अभिनयाची छाप सोडली आहे. तेजश्री आता बॉलिवूडमध्ये चमकणार आहे. ‘बबलू बॅचलर’ असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमात तिच्यासोबत शर्मन जोशी आणि पुजा चोप्रा हे कलाकार आहेत.