By  
on  

नवरात्रौत्सवाच्या सातव्या दिवशी अपूर्वा दिसली चंद्रपूरच्या महाकाली देवीच्या रुपात

यंदाच्या नवरात्रौत्वात शेवंता फेम प्रसिध्द टीव्ही अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर देवीची विविध रुपं आपल्या खास फोटोशूटमधून साकारतेय.  दरम्यान आज नवरात्रीचा  सातवा दिवस असून अपूर्वाने चंद्रपूरच्या महाकाली देवीचं रुप धारण केलं आहे. 

देवीच्या प्रत्येक रुपासोबतच तिचं माहात्म्यसुद्धा ती सांगताना देखील दिसत आहे. 

 

अपूर्वा महाकाली देवीचं रुप साकारत म्हणते, चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली हे गुफा मंदिर आहे.चंद्रपूर येथील महाकाली मंदिर गोंडकालीन असून याला वाकाटक कालाचाही संदर्भ आहे.महाकाली मंदिराच्या भिंतींवर शिल्पकलेहून तिबेटी आणि हिंदू परंपरेचे उत्कृष्ट मिश्रण दिसून येते.रंगीत चित्रकला हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.

शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हीचं नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने केलेलं हे सुंदर आणि हटके फोटोशूट चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरतंय. 

 

अपूर्वाच्या खास फोटोशूटवर चाहते लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करतायत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive