‘दृष्ट लागण्या जोगे सारे..’ या प्रसिध्द गाण्यातील नायिकेने वयाच्या ३१ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

By  
on  

मराठी सिनेसृष्टीत अशा अनेक नायिका आहेत ज्यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच रसिकांवर मोहिनी घातली. पहिल्याच सिनेमातून त्या प्रचंड लोकप्रिय ठरल्या. पण कालांतराने त्या सिनेविश्वापासून दुरावल्या. कोणी लग्न केलं, तर कोणी लग्नानंतर परदेशी स्थायिक झालं. तर कोणी आपला स्वत:चा व्यवसाय सुरु केला. काही अभिनेत्रींनी तर फारच लहान वयात या जगाचा निरोपही घेतला. त्याबद्दल आपल्याला क्वचितच काही माहित असेल. 

मराठीतले हॅण्डसम हंक अभिनेते अजिंक्य देव याचं ‘दृष्ट लागण्या जोगे सारे ...’हे लोकप्रिय गाणं आजही तितकंच सर्वांना प्यारं आहे. या गाण्यातील आणि ‘माझं घर माझा संसार ‘या सिनेमातील ही गोड अभिनेत्रीसुध्दा तुमच्या चांगलीच लक्षात असेल. खांद्यापर्यंत केसांची स्टाईल आणि गालावर पडणारी खळी यामुळे ही नायिका रसिकांना त्या काळी खुपच भावली. या सुंदर अभिनेत्रीचं नाव मुग्धा चिटणीस. 

'माझं घर माझा संसार ‘हा चित्रपट एवढा गाजला होता की, प्रेक्षकांनी तो अनेकदा पहिला. या चित्रपटातील रेल्वेमध्ये चित्रीत करण्यात आलेले “दृष्ट लागण्याजोगे सारे” हे गाणे प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहेत.

मात्र, दुर्दैवाने मुग्धा चिटणीस यांना हा चित्रपट केल्यानंतर कॅन्सरचा आजार डिटेक्ट झाला. 1994 मध्ये त्यांनी या आजारावर उपचार सुरू केले. मात्र दुर्दैवाने 1996 मध्ये त्यांचे निधन झाले.

ज्यावेळेस मुग्धा यांचे निधन झाले, त्यावेळेस त्यांची मुलगी ईशा ही खूप लहान होती. त्यामुळे उमेश घोडके यांनी यांनी तिचा काही वर्षे सांभाळ केला. त्यानंतर तिला आपल्या आजी-आजोबांकडे पाठवले. त्यानंतर दिशा ही चांगली शिकली.

आता ती अमेरिकेमध्ये राहत आहे. कायदे विभागामध्ये तिने पदवी देखील घेतलेली आहे. त्याचप्रमाणे जर्मन भाषेमध्ये तिने पदवी घेतली. तसेच पत्रकारितेमध्ये न्यूयार्क विद्यापीठातून तिने डिग्री घेतली आहे. मुग्धा चिटणीस यांच्या निधनानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती. दृष्ट लागण्या जोगे सारे या गाण्यांमधून त्या कायम आपल्या जवळच असतील.
 

Recommended

Loading...
Share