‘गोदावरी’ या सिनेमाच्या नावाबाबत अभिनेता जितेंद्र जोशीने केली ही खास बाब शेअर

By  
on  

अभिनेता जितेंद्र जोशी निर्मित गोदावरी या मल्टिस्टारर सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. या सिनेमात  ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी, जितेंद्र जोशी, गौरी नलावडे, प्रियदर्शन जाधव, सखी गोखले, संजय मोने अशी उत्तम स्टारकास्ट आहे.  या सिनेमाच्या नावाबाबत जितेंद्रने खास पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये जितेंद्र म्हणतो, ‘50 दिवस बाकी..

 

 

त्या दिवशी नाव ठरलं चित्रपटाचं !! कथेचं बीज होतं फक्त निखिल च्या मनात आणि माझ्या डोक्यात का कुणास ठावूक नाशिक!! 23 ऑगस्ट ला नाशकात दिवसभर फिरल्यानंतर रात्री निखिल म्हणाला चित्रपटाचं नाव
" गोदावरी" !!! मी साशंक होतो परंतु का कुणास ठावूक आश्र्वस्त देखील. दुसऱ्या दिवशी सुद्धा प्राजक्त देशमुख नाशिक फिरवत होता.

सोबत राहून वेगळं नाशिक ऐकवत / दाखवत होता. 24 ऑगस्ट 2020 रोजी संध्याकाळी नाशिक मध्ये गोदावरी च्या तीरावर काढलेला हा फोटो. . चित्रपट बनवण्या आधी लोकांच्या आणि नाशिकच्या अंतरंगात डोकावून बघत होतो. गोदावरी ला श्रद्धेने नमस्कार करून मनापासून प्रार्थना केली की हा सिनेमा तुझ्या काठावर येऊन करतो आहे. संपूर्ण जबाबदारी तू घे आणि सांभाळ आम्हा सर्वांना. असंख्य अडचणी असंख्य गोष्टी पार पाडत गोदावरी चं चित्रण निखिल आणि टीम ने यशस्वीरीत्या पार पाडलं .

आज च्या घडीला 2 मानाच्या आतंरराष्ट्रीय महोत्सवात निवड होऊन तिथल्या वेगवेगळ्या प्रेक्षकांची पसंती मिळवून बरोब्बर 50 दिवसानंतर 3 डिसेंबर रोजी आपला गोदावरी चित्रपट तुम्हा सर्वांच्या भेटीला येतोय. मी निश्चिंत आहे. कारण जबाबदारी गोदामाई ने घेतली आहे; त्याच दिवशी!!!

Recommended

Loading...
Share