सेैराटचा परश्या म्हणजे लाखो तरुणींच्या हदयाची धडकन. आकाशच्या सैराट सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. त्यामुळे तो रातोरात स्टार बनला. परश्या फेम आकाश ठोसरच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये तरुणींचा खुप मोठा सहभाग आहे. अशातच सोशल मिडीयाच्या माध्यमामुळे आजकाल स्टार्स आणि चाहत्यांमधलं अंतरही कमी झालंय. त्यातच आत्ता अंकिताने आकाश प्रपोज केलं आहे. आत्ता तुम्ही म्हणाल अंकिता कोण, आकाशची गर्लफ्रेंड का...त्याने तिला होकार दिला का.
तर झालं असं, एका लव्हलेटरवर आकाशला सतत टॅग करण्यात येतंय. आणि ते सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झालं आहे.
मागील काही आठवड्यांपासून सोशल नेटवर्किंगवर एक लव्ह लेटर तुफान व्हायरल होतं आहे. हे लव्ह लेटर ज्या व्यक्तीसाठी लिहिण्यात आलंय त्याचं नाव ‘आकाश’ असं आहे. “प्रिय आकाश, तू मला प्रपोज केला आणि तुला मी जे काही म्हटले, त्यासाठी सर्वात आधी सॉरी. नंतर मी विचार केला आणि माझं मन सांगत होतं तूच आहेस तो ज्याची मी वाट बघते. जर माझ्या आधी तुला कोण आवडत असेल, तर नाही म्हटलास तरी चालेल. तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल, तर हो म्हण. माझ हृदय तुला दिलंय, तुझं हृदय मला दे, प्रेम करते तुझ्यावर एवढे तरी समजून घे, तुझी अंकिता,” असा हताने लिहिलेला मजकूर या लव्ह लेटरवर आहे.
आता हे लेटर व्हायरल झाल्यानंतर आकाश ठोसरच्या काही चाहत्यांनी या पत्रामधील ‘आकाश’ हा आपलाच लाडका अभिनेता आकाश आहे असं वाटलं आणि त्यांनी लेटर आकाश ठोसरला पर्सनल मेसेजच्या माध्यमातून पाठवण्यास सुरुवात केली. मात्र परश्या या प्रकरणाला भलताच वैतागला आणि स्टोरीवर तो फोटो शेअर करत तो आकाश मी नाही असं सर्वांना त्याने स्पष्ट केलं.