सौंदर्य सम्राज्ञी माधुरी दीक्षित आज लग्नाचा 22 वा वाढदिवस साजरा करते आहे. करिअर ऐन भरात असताना माधुरीने डॉ. नेनेंसोबत लग्न केलं आणि अमेरिकेला गेली. पण या दोघांचं बाँडिंग चाहत्यांना नेहमीच कपल गोल्स देत आलं आहे. त्यानंतर दोन्ही मुलं मोठी झाल्यावर माधुरीने बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याचा निर्णय घेतला.
अर्थातच माधुरीची सेकंड इनिंगही यशस्वी झाली आहे. आज माधुरी घर आणि करिअर याचा उत्तम समतोल सांभाळतानाही दिसते आहे. माधुरी आज पती श्रीराम नेनेंसोबत लग्नाचा 22वा वाढदिवस साजरा करते आहे. एकत्र असण्याची जादुई 22 वर्षं हे कॅप्शन देत तिने एक व्हिडियो शेअर केला आहे.