सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. सोशल मिडीया हेच आता नवं विश्व बनलं आहे. प्रत्येकजण सोशल मिडीयासाठी जगताना दिसतोय. युझर्स प्रत्येक गोष्टीवर बारकाईने नजर ठेवून असतात. मग त्यांची चाणाक्ष नजर व्यक्ती असो वा त्यांचे फोटो चूक शोधण्यात तिक्ष्ण असते. असाच अनुभव महानायक अमिताभ बच्चन यांना देखील आला आहे. सोशल मीडियावरील युझर्सने बिग बी यांनी केलेल्या जाहिरातीमधील एक चूक शोधून काढली. जाहिरातीच्या फोटोमधील झालेली चूक निदर्शनास आल्यानंतर ती व्हायरल झाली. हा व्हायरल फोटो अनेकांपर्यंत पोहचला व सर्वच यावर कमेंट करु लागले.
त्याचं झालं असं आपली मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत आणि बिग बी अमिताभ बच्चन यांनी एका ज्वेलरी ब्रॅण्डसाठी एड कॅम्पेन केलं. त्यात अमिताभ यांनी पूजाच्या खांद्यावर हात ठेवला आहे. लग्नसोहळ्यातला हा प्रसंग दिसतोय. परंतु पूजाच्या खांड्यावरचा तो हात अमिताभ यांचा नसल्याचं यूझर्सनी अचूक हेरलंय. व ही फोटोशॉपची किमया असल्याचं निदर्शनास आणलं आहे.