By  
on  

ऐतिहासिक भूमिकेत दिसत असलेल्या या अभिनेत्रीने केला सोशल मिडियाला रामराम

अनेक ऐतिहासिक भूमिकातून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे स्नेहलता वसईकर. स्नेहलताने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती पुण्यश्लोक अहिल्याबाई या ऐतिहासिक हिंदी मालिकेत अभिनेत्री स्नेहलता वसईकर गौतमीबाई अर्थात मल्हार राव होळकर यांच्या पत्नी व अहिल्याबाईंच्या सासूबाईच्या भूमिकेत दिसत आहे. 

 

 

स्नेहलता सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट असते. पण आता मात्र तिने सोशल मिडियापासून फारकत घेतली आहे. Going offline for temporary…. हे कॅप्शन तिने या पोस्टला दिले आहे. शारीरिक आणि मानसिक मेंटनेंन्स साठी तात्पुरतं बंद करत आहे अशी पोस्ट तिने शेअर केली आहे. आता चाहते तिच्या परतीची वाट पाहात आहेत हे मात्र खरं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive