पाहा, जे.पी.दत्ता यांच्या पलटन सिनेमातील व्यक्तिरेखा; 1967च्या युध्दावर आहे आधारित

By  
on  

उमराव जान आणि बॉर्डर या सिनेमांसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे दिग्दर्शक जे.पी दत्ता लवकरच एक मोठा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. पलटन असं त्यांच्या आगामी सिनेमाचं नाव असून सिनेमात कलाकारांची तगडी फौज पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचे नुकतेच विविध पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.

जवळपास 50 वर्षांपूर्वी 11 सप्टेंबर रोजी सिक्कीम सीमेवर भारत-चीन युध्द सुरू झाले होते. 1967 साली झालेल्या भारत-चीन युध्दाच्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा आधारित आहे. हा सिनेमा या युध्दातील शहीदांना समर्पित करण्यासाठी या युध्दाच्या तारखेच्या जवळपास प्रदर्शित करण्यात येत असल्याचे जे.पी दत्ता यांचे म्हणणे आहे.

पलटन सिनेमाच्या पोस्टर लॉन्चवेळी जे.पी दत्ता म्हणाले, “1962 मध्ये चीनने या युध्दाला सुरुवात केली होती आणि 1967 मध्ये भारताने हे युध्द समाप्त करण्यात आले. हा इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे, जो प्रेक्षकांपर्यंत या सिनेमाद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यात येईल.”

जॅकी श्रॉफ, सोनू सूद, हर्षवर्धन रहाणे, गुरमीत चौधरी, अर्जुन रामपाल, सोनल चौहान आदी कलाकार सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

येत्या 7 सप्टेंबर रोजी पलटन प्रदर्शित होत आहे.

Recommended

Loading...
Share