टिक टॉक बंद झाल्यानंतर बेरोजगार झाला होता रितेश देशमुख, जाणून घ्या

By  
on  

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. रितेशच्या अभिनयाचं, त्याने साकारलेल्या व्यक्तिरेखांचं नेहमीच कौतुक होतं. तसंच पत्नी आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख सोबतची त्याची ऑनस्क्रीन व ऑफस्क्रीन केमिस्ट्री रसिकांना खुप भावते. दोघंही सोशल मिडीयावर बरेच स्करीय असतात. नानाविविध भन्नाट व्हिडींओमधून ते चाहत्यांचं मनोरंजन करतात. भारतात जेव्हा टिकटॉक एप सुरु होतं त्यावेळेस या जोडीचे प्रचंड फॉलोवर्स होते. त्यांच्या व्हिडीओंना खुप मोठी पसंती मिळायची. 

रितेशसोबत त्याची पत्नी जिनिलिया देशुमुख देखील त्या व्हिडीओमध्ये असायची. त्यांचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल व्हायचे. त्यांचे हे विनोदी व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचे जणू काही संपूर्ण टेन्शन निघून जात होतं. मात्र, काही काळानंतर टिक टॉक भारतात बंद करण्यात आलं आणि त्यावर रितेशने अलिकडेच एक वक्तव्य केलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

रितेश म्हणाला होता की “टिक टॉक बंद झाल्यानंतर तो बेरोजगार झाला होता. करोना काळात लोकांचं मनोरंजन कसं करु असा प्रश्न सतावत होता परंतु, इन्स्टाग्रामवरील रील्स फीचर इंट्रोज्युझ झाल्यापासून त्याला पुन्हा काम मिळालं.” तर त्या कठीण काळात रितेश आणि जिनिलियाने सगळ्यांचे मनोरंजन केले.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

Recommended

Loading...
Share