सुयश टिळक आणि आयुषी भावेचा Wedding Look व्हायरल

By  
on  

सेलिब्रिटी वर्तुळातील गोड कपल सुयश टिळक आणि आयुषी भावे ही जोडी आज लग्नबंधनात अडकतेय. दोन दिवसांपूर्वीच या सेलिब्रिटी  जोडीचा हळदी समारंभ थाटात पार पडला होता. आयुषी आणि सुयशला हळद लावलेल्या फोटोंमध्ये छान दिसत आहेत. या दोघांच्या हळदी समारंभाचे फोटो पाहून त्या दोघांच्याही चाहत्यांना खुप आनंद झाला होता. आता त्यांच्या लग्नातले काही फोटो व्हायरल झाले आहेत. यात त्यांचा  Wedding Look  पाहायला मिळतोय. 

 

करोनामुळे काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये सुयश आणि आयुषीचा हळदीचा कार्यक्रम मंगळवारी झाला . सुयशने त्याच्या इन्स्टा स्टोरीला त्याच्या हळदीच्या कार्यक्रमाचे काही फोटो ठेवले होते. त्यावर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.

 त्यामध्ये काही जवळचे मित्र व कुटुंबीय दिसत आहे. मंगळवारी हळद झाल्यामुळे २० किंवा २१ ऑक्टोबर रोजी आयुषीसोबत तो लग्नगाठ बांधेल अशी चर्चा  सुरु आहे. 

Recommended

Loading...
Share