'अंतिम'च्या शूटिंगवेळी केमोथेरिपी घेत होतो - महेश मांजरेकर

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतले दिग्गज अभिनेते निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या सिनेमाचा एक वेगळाज बाज असतो. चाहत्यांना त्यांच्या नव्या प्रोजेक्टबाबत नेहमीच उत्सुकता लागून राहते. काही महिन्यांपूर्वी अभिनेते महेश मांजरेकर यांना कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यानंतर महेश मांजरेकर आता कॅन्सरमुक्त झाले आहेत त्यानंतर ते काही दिवस रुग्णालयातच होते. याबद्दल बोलताना महेश यांनी 'अंतिम' सिनेमाच्या ट्रेलर रिलीजच्या कार्यक्रमात काही खुलासे केले. 

महेश मांजरेकर म्हणाले, 'माझे ३५ किलो वजन कमी झाले आहे. 'अंतिम'सिनेमा चित्रीकरणाच्या शेवटच्या टप्प्यावर होता त्यावेळी मला कॅन्सर असल्याचे समजले. कॅन्सर असल्याचे समजल्यावर लगेचच उपचार सुरू झाले. त्यावेळी मी केमोथेरेपी घेत होतो. आता तुम्हा सर्वांना हे सांगताना मला अत्यानंद होत आहे की, मी आता कॅन्सर मुक्त झालो आहे. माझी संपूर्ण टीम काळजी घेत होती, त्यामुळे मला काहीच त्रास झाला नाही. आयुष आणि सलमान या दोघांनीसुध्दा शुटींगच्यावेळी मला खुप सहकार्य केलं. मी सलमानला अनेक वर्षांपासून ओळखतो. तो माझ्या भावाप्रमाणे असून आम्ही दोघांनी अनेक सिनेमांत काम केले आहे.त्यामुळे त्याला दिग्दर्शित करणं माझ्यासाठी नवीन नव्हतं. मला अचूक माहित होतं त्याच्याकडून नेमकं काय काढून घ्यायचं. '

Recommended

Loading...
Share