अभिनेते, खासदार अमोल कोल्हे यांनी घेतला महत्त्वपुर्ण निर्णय

By  
on  

अभिनयासोबतच राजकारणातही उत्तम करिअर घडवण्यासाठी अमोल कोल्हे सतत प्रयत्नशील असतात. यासाठी कधी खासदार कधी अभिनय अशी दुहेरी जबाबदारी अमोल कोल्हे पेलताना दिसतात. सध्या अमोल यांच्या एका पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मिडियावरील मांडण्यात येणा-या त्यांच्या भूमिकेबाबत त्यांनी मत व्यक्त केलं आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

 

ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, इन्स्टाग्रामवर नजर टाकताना अनेकदा निदर्शनास आलं की पोस्ट वर प्रतिक्रिया देताना "अभिनेता" की "नेता"अशी अनेकांची गल्लत होते. राजकीय भूमिका प्रत्येकाची वेगळी असू शकते पण ती भूमिका पडद्यावरील, समाजमाध्यमावरील भूमिकेच्या आड येऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळेच एक निर्णय घेतला आहे- इन्स्टाग्रामवर इथे राजकीय पोस्ट करायची नाही. म्हणजे confusion नको. राजकीय पोस्ट साठी फेसबुक पेज आहेच. चालेल ना? टीप:- जबाबदार नागरिकाच्या भूमिकेतून मांडलेल्या विचाराला राजकीय भूमिका समजण्यात येऊ नये. सोशल मिडियावर चाहते अमोल यांच्या निर्णयाचं कौतुक करत आहेत.

Recommended

Loading...
Share