स्नेहासोबतच्या नात्यावर आणि करिअरबाबत बोलला पुर्व पती आविष्कार, वाचा सविस्तर

By  
on  

बिग बॉस मराठी 3 च्या घरातील नव्या जोड्यांसोबत चर्चेत असलेली पुर्वाश्रमीची जोडी म्हणजे स्नेहा वाघ आणि आविष्कार दारव्हेकर. पण नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अविष्कार आणि स्नेहा यांच्यामध्ये संवाद झाल्याचे दिसले. दरम्यान स्नेहाने ‘मला तुझ्या मदतीची गरज नाही’ असे अविष्कारला म्हटलं आहे.

या दरम्यान आविष्कार दारव्हेकरची एक मुलाखत व्हायरल होताना दिसते आहे. यामध्ये आविष्कार म्हणतो, ‘ स्नेहासोबतच्या घटस्फोटाचा माझ्या करीअरवर खूप मोठा परिणाम झाला. याउलट स्नेहाने तिचे करिअर केले, हे यश मिळवताना तिने कुठेही माझे नाव वापरले नाही. तिने जे काही केले ते तिच्या हिंमतीवर केले.

या गोष्टीचा मला नक्कीच गोष्टीचा अभिमान आहे. आम्ही दोघे वेगळे झाल्यानंतर तिने काहीच केले नसते तर मला त्रास झाला असता. स्नेहासोबतच्या लग्नाचा मला कुठेही पश्चाताप नाही. पण प्रत्येक लग्न यशस्वी ठरेलच असं नाही.त्याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. घटस्फोट झाल्यानंतर मला देखील खूप एकटे पडल्यासारखे वाटले. परंतु मी याबाबत कधीच कुणाशीच चर्चा केली नाही.’ प्रेक्षक माझ्याविषयी कोणताही पुर्वग्रह मनात न ठेवता माझी बाजू घेतात याचा आनंद आहे.

Recommended

Loading...
Share