‘मन उडू उडू झालं’ फेम अजिंक्य राऊतच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावला जीव

By  
on  

‘मन उडू उडू झालं’ मालिकेला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.  या मालिकेत इंद्रा साकारणा-या अजिंक्य राऊतच्या गाडीला अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही इजा झाली नाही. त्याने स्वत: एक व्हिडीओ पोस्ट करत सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. 

 

 

आपल्या व्हिडियोमध्ये अजिंक्य म्हणतो, ‘नमस्कार मी अजिंक्य राऊत, आपण सर्वांनी दिवाळी साजरी केली. दरवर्षी प्रमाणे यंदाही मी दिवाळीला गावी जात होतो. पण जात असताना माझ्या गाडीचा अपघात झाला. सुदैवाने मला कोणतीही इजा झाली नाही. “या अपघातानंतर एक गोष्टी नक्की शिकलो ज्यावेळी एखादा जीवघेणा प्रसंग समोर येतो प्रसिद्धी, वलय किंवा इतर गोष्टी उपयोगाच्या नसतात.

मी या अपघातातून वाचलो यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजतो. स्वत:ची काळजी घ्या. कारण माझ्या लक्षात आले आहे की, सर्व काही एका सेकंदात सर्व काही संपू शकते. कोणताही चमत्कार होण्याची वाट पाहू नका. फक्त पुढे जा आणि तुमची स्वप्ने पूर्ण करा.’

Recommended

Loading...
Share