शाहिद कपूरचा ‘अर्जुन रेड्डी’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By  
on  

बॉलिवूडमध्ये साऊथ सिनेमांचे रिमेक तयार करणे यात काही नवल नाही. आजवर अनेक साऊथ सिनेमांचे रिमेक आपण बॉलिवूडमध्ये पाहिले आहेत. मागच्याच वर्षी आलेला ‘अर्जुन रेड्डी’ हा तेलुगू सिनेमा सुपरहिट ठरला होता.याच सिनेमाचा हिंदी रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महत्त्वाचं म्हणजे यात शाहिद कपूर प्रमुख भूमिकेत दिसेल.

शाहिदने नुकतीच ‘बत्ती गुल मीटर चालू’ सिनेमाची शुटींग पूर्ण केली असून लवकरच तो या रिमेकच्या तयारीला लागणार आहे. येत्या 20 ऑगस्टपासून शाहिद ‘अर्जुन रेड्डी’ सिनेमाच्या शुटींगला सुरुवात करेल. या सिनेमाच्या शुटींगला होणारा उशीर यामागे एक मस्त कारण सांगितलं गेलं, ते म्हणजे या रिमेकसाठी शाहिदला आपल्या लूकमध्ये बरेच बदल करावे लागणार आहेत. त्याला या व्यक्तिरेखेसाठी दाढी वाढवणं फार आवश्यक आहे आणि शाहिदला कुठल्याही नकली गोष्टींचा आधार घ्यायला आवडत नाही, म्हणून त्याला दाढी वाढविण्यासाठी वेळ मिळावा म्हणून सिनेमाच्या शुटींग शेड्युलमध्ये बदल करण्यात आले.

https://twitter.com/TSeries/status/1024241888629538816

या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये शुटींगला सुरुवात होणा-या ‘अर्जुन रेड्डी’ हा सिनेमा पुढील वर्षी 21 जून 2019 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे टी-सीरीजद्वारे सांगण्यात आले आहे. भूषण कुमार सिनेमाची निर्मिती करत आहेत. टी- सीरीज आणि सिने 1 स्टुडिओ यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. याबाबतचं एक ट्विट करुन ही माहिती देण्यात आली.

‘अर्जुन रेड्डी’मध्ये शाहिदला पाहण्यासाठी सर्वचजण उत्सुक आहेत. सर्वांनाच या सिनेमाच्या फर्स्ट लूकची उत्सुकता लागून राहिली आहे.

 

Recommended

Loading...
Share