या कारणासाठी निलेश साबळेंना मागावी लागली नारायण राणेंची माफी

By  
on  

चला हवा येऊ द्या हा झी मराठीवरील प्रेक्षकांचा आवडता शो आहे. यावर अनेकदा विंडबनात्मक स्कीट केलं जातं. पण यातील एका स्कीटमुळे सुत्रसंचालक निलेश साबळे यांना नारायण राणेंची माफी मागावी लागली आहे. या शो मधील एका स्कीटमध्ये नारायण राणेंशी मिळतं जुळतं पात्र रंगवण्यात आलं होतं. 

 

 

यामध्ये राणेंबाबत काही नकारात्मक कंटेट होता. यामुळे राणे समर्थकांनी फोन करुन भावना दुखावल्याचं स्पष्ट केलं. यानंतर निलेश साबळे यांनी राणे यांच्या घरी जाऊन राणेंची माफी मागितली आहे.

Recommended

Loading...
Share