‘त्या’ कमेंट्सना वैतागून अपुर्वा नेमळेकरने सोडली रात्रीस खेळ चाले मालिका, वाचा सविस्तर

By  
on  

रात्रीस खेळ चाले मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली खरी पण दुसरा सीझन गाजवला तो शेवंताने. अपुर्वा नेमळेकरने साकारलेल्या शेवंताने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली. 
पण अलीकडेच अपुर्वाने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. तिच्या अचानक जाण्याने प्रेक्षकांमध्येही उलट सुलट चर्चा सुरु आहे.

 

 

अपुर्वानेच याबाबत पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे. अपुर्वाने यात सेटवर केल्या जाणा-या बॉडीशेमिंग बाबत सांगितलं आहे. सेटवर अनेकदा तिला वजनाबाबत कमेंट्स ऐकाव्या लागल्या होत्या. तसेच पेमेंटबाबतही चॅनेलकडून अनेकदा टाळाटाळ केली गेले असल्याचं अपुर्वा या पोस्टमध्ये म्हणते आहे.

 

 

‘मी अत्यंत प्रामाणिकपणे चॅनेलशी एकनिष्ठ राहून काम केलं. पण माझ्या कष्टाचा मोबदला मला मिळत नसेल, माझ्या प्रामाणिक कष्टाची अवहेलना जिथे होत असेल आणि नवख्या कलाकारांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असेल अशा ठिकाणी काम करणं माझ्या तत्त्वात बसत नाही. त्यामुळे मी या शोमध्ये न राहण्याचा निर्णय घेतला.’  या पोस्टवर चाहतेही तिला सपोर्ट करताना दिसत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share