अन्नपुर्णा विठ्ठल यांच्या आरोपानंतर सुनील बर्वे यांची प्रतिक्रिया समोर

By  
on  

अलीकडेच ‘सहकुटुंब सहपरिवार’ सुर्याच्या आईच्या भूमिकेत दिसणा-या अन्नपुर्णा विट्ठल यांनी मालिकेतील कलाकार आणि निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते. युट्युबचॅनेलवरुन शेअर केलेल्या हिंदी व्हिडियोमध्ये त्यांनी ही व्यथा मांडली होती.

या मालिकेच्या सेटवर मानसिक त्रास देणे, रॅगिंग करणे अशी तक्रार त्यांनी केली होती. सुनिल बर्वे, किशोरी आंबिये, नंदिता पाटकर, भरत गायकवाड, विठ्ठल डाकवे या कलाकारांवरही त्यांनी आरोप केले होते.

अन्नपुर्णा यांच्या आरोपावर सुनील बर्वे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, अन्नपुर्णा आमच्याबद्दल खोटं पसरवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न का करत आहेत, हेच कळत नाही. मालिका सोडणं ही त्यांची निवड होती. पण, मालिका सोडल्यानंतर त्यांनी असं का केलं, असे व्हिडीओ का बनवले हे मात्र आकलनाच्या पलीकडे आहे.’

Recommended

Loading...
Share