By  
on  

अभिनेत्री शुभांगी गोखलेंचं सोशल मिडिया अकाउंट झालं हॅक

सोशल मिडियावर सध्या हनी ट्रॅप लिंकची चर्चा जोरदार आहे. लिंक पाठवून पैसे उकळण्यासाठी हा प्रकार केला जात आहे. अभिनेत्री शुभांगी गोखलेंनाही अशा प्रकारच्या हॅकिंगचा अनुभव आला आहे. शुभांगी यांचं फेसबुक अकाउंट हॅक झालं आहे. 

 

 

त्यांच्या अकाउंटवरुन पाठवलेल्या लिंक वर क्लिक केल्यास अश्लील फोटो उघडले जात असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ‘हा मेसेज गेले अनेक दिवस फेसबुक मेसेंजर वर फिरतोय. कृपया कुणी तुम्हाला ही लिंक पाठवली तर ओपन करू नका. ओपन केलीत तर तुमच्या प्रोफाईलवरून इतरांना मेसेज जातील.

ही एक व्हायरस लिंक आहे. तुम्ही जर क्लिक केलं तर ही लिंक तुम्हाला फेक युट्युब सारख्या दिसणाऱ्या साईटवर घेऊन जाते. जिथे मेसेंजर सारखंच पेज दिसतं, तिथे लॉग इन केल्याशिवाय व्हिडिओ दिसणार नाही असं सांगितलं जातं…हा ट्रॅप आहे यात अडकू नका’ ही पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive