By  
on  

कुणीतरी येणार गं ! या अभिनेत्रीकडे आहे गोड बातमी

आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलेली अभिनेत्री प्राजक्ता हनमघरने गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. प्राजक्ताने नुकतेच तिच्या डोहाळजेवणाचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

 

 

जरा विसावू या वळणावर’….असे कॅप्शन देऊन प्राजक्ताने हे फोटो शेअर केले आहेत. ती गर्द हिरव्या रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांकडून देखील तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस, फु बाई फु या सारख्या विनोदी कार्यक्रमातून प्राजक्ताला विशेष ओळख मिळाली.

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive