कोण आहे एलिझाबेथ..? स्वप्नील जोशी पूजा सावंत स्टारर ‘बळी’चा पाहा ट्रेलर

By  
on  

मराठी सिनेविश्वातील सर्वांचा लाडका अभिनेता स्वप्निल जोशीचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित बळी या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यासोबतच सिनेमाचं एक नवं पोस्टरसुध्दा दिसतंय. यात एका बालकलाकारासह अभिनेत्री पूजा सावंतसुध्दा सिनेमात झळकणार असल्याचं स्पष्ट होतय. 

स्वप्निल जोशीने या सिनेमाचा ट्रेलर नुकताच शेयर केला आहे. तो खुपच रहस्यमयी आणि थरारक आहे. . या चित्रपटामध्ये कोण आहे एलिझाबेथ..? हे गूढ रहस्य उलगडणार आहे.

या हॉरर मराठी चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. हा चित्रपट ९ डिसेंबर रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘जीसिम्स’ने केली आहे. 

 

दिग्‍दर्शक विशाल फ्युरिया म्‍हणाले, ''हॉरर या शैलीने माझे लक्ष वेधून घेतले आहे आणि या शैलीमधील प्रत्‍येक चित्रपटासह काहीतरी नवीन घेऊन येण्‍याचा माझा सातत्‍याने प्रयत्‍न राहिला आहे. सर्वोत्तम भयपट म्‍हणजे मनावैज्ञानिकाशी संबंधित चित्रपट, जे वास्‍तविकतेपासून दूर असलेल्‍या पात्रांसाठी सहानुभूती निर्माण करतात. आपण जे पाहतो त्‍यावर जितका अधिक विश्‍वास ठेवू, ते तितके अधिक रोमांचक बनत जाते. हेच‘बळी च्‍या बाबतीत आहे. या चित्रपटामधील सर्व पात्रांमधील भावना, भय लक्षवेधक आहेत. 

Recommended

Loading...
Share