अभिनेत्री सायली संजीवला पितृशोक, बाबांसोबतचे फोटो पोस्ट करत झाली भावूक

By  
on  

मराठी मालिका आणि सिनेविश्वातील प्रसिध्द अभिनेत्री सायली संजीव हिच्या वडिलांचं निधन झालं आहे. सायलीनेच ही दु:खद बातमी सोशल मिडीयावरुन चाहत्यांना दिली. सायलीच्या वडिलांचं 30 नोव्हेंबर रोजी निधन झालं आहे. ते 63 वर्षांचे होते.

बाबांसोबतचे अनेक फोटो पोस्ट करत सायलीने भावूक करणा-या ओळी लिहल्या आहेत. सायली म्हणते, "तुला माहित आहे नं बाबा माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं, आहे आणि कायम असेल.. या जगात सगळ्यात जास्त.. तू आयुष्य आहेस माझं ..

दैव होता तू, देव होता तू,
खेळण्यातला माझा खेळ होता तू..
शहाणी होते मी, वेडा होता तू,
माझ्या साठी कारे सारा खर्च केला तू..
आज तू फेडुदे पांग हे मला,
जगण्या रे मला अजूनही तूच हवा..

बाबा, थांब ना रे तू
बाबा, जाऊ नको दूर…"

 

 

सायली्च्या या भावूक पोस्टवर चाहत्यांसह सुबोध भावे, मृण्मयी देशपांडे, सुयश टिळक, प्रार्थना बेहरे, रेश्मा शिंदे, अभिषेक देशमुख, सलील कुलकर्णी, कुंजिका काळवीट आदी अनेक कलाकारांनी श्रध्दांजली वाहली आहे.  

Recommended

Loading...
Share