संजना फेम रुपाली भोसलेचा पैठणीतला हा साज पाहिलात का?

By  
on  

आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीची मालिका आहे. या मालिकेच्या कथानकाने रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यश मिळवलंय. या मालिकेतल्या सर्वच व्यक्तिरेखा लोकप्रिय आहेत. या मालिकेत संजना ही खलनायिका व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले हिच्या अभिनयाचं नेहमीच कौतुक होतं.

मालिकेत खलनायिका म्हणून टीकेची धनी होणारी संजना ऑन स्क्रीनप्रमाणे ऑफस्क्रीनसुध्दा प्रचंड स्टायलिश आहे. पण साडीवर तिचं जीवापाड प्रेम आहे.  रुपालीने पैठणीत केलेलं फोटोशूट खुप व्हायरल होतंय. 

 

रुपाली सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. 

या हिरव्यागार पैठणीत रुपालीच्या सौंदर्याला चारचॉंद लागले आहेत.

रुपालीच्या या खास फोटोशूटवर चाहते लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 

 

Recommended

Loading...
Share