'अरुंधती' फेम आईचा ग्लॅमरस लुक होतोय व्हायरल, पाहा Photos

By  
on  

आई कुठे काय करते ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा लोकप्रिय आहेत. नुकतंच या मालिकेतील मुख्य भूमिकांमधील कलाकारांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान करण्यात आला. मालिकेतील  सर्वांची लाडकी आई म्हणजेच अरुंधती फेम अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभूलकर प्रेक्षकांच्या हदयावर अधिराज्य गाजवतेय. 

मालिकेत प्रेमळ पण प्रसंगी खंबीर आणि कठोर होणारी आई रसिकांना खुप भावते. आपलीशी वाटते. तिच्या अभिनयाचं नेहमीच कौतुक होताना पाहायला मिळतं. आई फेम मधुराणीने अलिकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा एक ग्लॅमरस फोटो चाहत्यांशी शेयर केला आहे. यात मधुराणी कमालीची सुंदर दिसतेय. तिच्या या गुलाबी रंगाच्या ड्रेसवर चाहते लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करतायत. 

 

नेहमीच एका सर्वसामान्य गृहिणीप्रमाणेच मालिकेत वावरताना दिसणा-या आईचा हा नवा लुक रिफ्रेशिंग ठरतोय. त्यामुळेच मालिकेत सुध्दा आई या रुपात दिसणार का याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.  

अनिरुद्ध आणि अरुंधतीचा २५ वर्षांचा संसार अखेरिस मोडला. घटस्फोटानंतर अरुंधतीने तिचं स्वतंत्र विश्व निर्माण केलंय. आश्रमातील नोकरी, गाण्याचे क्लासेस आणि आता तर ती व्यावसायिक रुपातही गाणं गाण्याचा निर्णय घेतलाय. 

 

सध्या ही मालिता अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. आशुतोष हा अरुंधतीचा कॉलेजमधला मित्र असून तो एक यशस्वी बिझनेसमन आहे. बऱ्याच वर्षांनंतर अरुंधती आणि आशुतोषची एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट झाली. आशुतोषचं कॉलेजपासून अरुंधतीवर प्रेम होतं, पण त्याने ते कधीच व्यक्त केलं नाही, आता गाण्याच्या अल्बम निमित्ताने दोघांच्या सतत गाठी-भेटी होत आहेत. आता हे नातं कोणतं वळण घेणार ह्याची उत्सुकता आहे.

Recommended

Loading...
Share