By  
on  

‘१४ वर्षे दोन पाहुणे घराबाहेरच ठेवले आहेत’- अमोल कोल्हे

अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पत्नी अश्विनी कोल्हे यांच्यासोबतचे काही फोटो शेयर करत त्यांना वाढदिवसाच्या खुप खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. 

अमोल कोल्हे पोस्टमध्ये म्हणतात," १४ वर्षांच्या वनवासाचं फलित काय असतं ते माहीत नाही पण १४ वर्षांच्या सहवासाचं फलित नक्कीच चांगलं आहे.. माणूस म्हणून समृद्ध होणं, संसाराच्या परिघात व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करणं, परस्परपूरक भूमिका घेणं या प्रत्येक गोष्टीत आणखी सुधारणा होत असताना..दोन पाहुणे मात्र आजवर घराबाहेरच ठेवले आहेत... ताटकळत...१) "तू चूक" आणि २) "मीच बरोबर"....कारण तेवढं केलं की सहवासाबरोबरच विरहाच्याही प्रत्येक क्षणाचा सोहळा होतो.. समाधानाच्या उंबरठ्याच्या आत सुख नांदतं यावरचा विश्वास दृढ करणाऱ्या सहचारिणीस लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!"

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

Recommended

PeepingMoon Exclusive