आपल्या लाडक्या लक्ष्याचं हे स्वप्न होणार पूर्ण, जाणून घ्या

By  
on  

आपल्या लाडक्या लक्ष्याचे म्हणजेच अभिनेते लक्ष्मिकांत बेर्डे यांचे असंख्य फॅन्स आहेत. चाहत्यांना खळखळून हसवणा-या लक्ष्मिकांत बेर्डे यांचं अकाली निधन झालं. लक्ष्मिकांत बेर्डे म्हणजे एक सच्चा जिंदादील व्यक्तिमत्त्व. त्यांच्या कारकिर्दीच्या काळात ते त्यांच्याजवळील गरजू तंत्रज्ञ आणि इतर कलाकारांच्या मदतीस नेहमीच पुढाकार घेत. म्हणूनच लक्ष्मिकांत बेर्डे यांच्या १७ व्या स्मृतीदिनी बेर्डे कुटुंबाने एक मोठी घोषणा केली आहे.

 

१६ डिसेंबर २०२१ रोजी लक्ष्मिकांत यांची १७ वी पुण्यतिथी होती. त्यानिमित्ताने बेर्डे कुटुंबाने लक्ष्यकलामंचची मोठी घोषणा केली. ही लक्ष्मिकांत बेर्डे यांचीच इच्छा होती. महाराष्ट्रातील खेड्या-पाड्यात , अनेक गावांमध्ये अनेक असे होतकरु कलाकार आहेत त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाही.अशा कलाकारांना योग्य दिशा दाखविण्यासाठी एका मंचाची स्थापना करण्याची लक्ष्मिकांत बेर्डे यांची इच्छा होती. तिच संकल्पना आम्ही पूर्ण करण्याचं शिवधनुष्य पेलत आहोत असं प्रिया बेर्डे या लक्ष्यकलामंचच्या स्थापनेवेळी म्हणाल्या. 

 

Recommended

Loading...
Share