माझी तुझी रेशीमगाठ : यशने केली परांजपेची जबरदस्त धुलाई

By  
on  

माझी तुझी रेशीमगाठ ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. या मालिकेत सध्या नेहाच्या लग्नाचा विषय सुरु आहे. कपटी आणि डावपेच आखणारा परांजपे वकील नेहाला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतोय. त्याचा प्रयत्न कुठेतरी यशस्वी होताना दिसतोय. कारण नेहा आणि परांजपे वकिलाच्या लग्नाची तयारी आता सुरु झाली आहे. नेहा मनाविरुध्द लग्न करतेय. तर यशचासुध्दा हिरमोड झाला आहे. पण परांजपे वकील मात्र नेहाशी लग्न होणार म्हणून भलताच खुश आहे. पण या लगीनघाईत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. 

परांजपे वकिलाचे खोटे कारनामे आता यशसमोर येणार असून तो त्याची  चांगलीच धुलाई करणार आहे. परांजपे वकिलाला मारतानाचे जबरदस्त फोटो झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतायत. लवकरच मालिकेत हे हवहवंसं रंजक वळण प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 

Recommended

Loading...
Share