'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतील या अभिनेत्रीचा झाला साखरपुडा

By  
on  

सध्या सर्वत्र लग्नसोहळे, साखरपुडा असं मंगलमय वातावरण पाहायला मिळतंय. मराटी कलाविश्वातसूध्दा सनईचे सूर ऐकायला मिळतायत. जय जय श्री स्वामी समर्थ ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. या पौराणिक मालिकेत चांदुलीची खाष्ट आई कालिंदी साकारणारी म्हणजेच खलनायिकी भूमिकेत झळकणारी प्रसिध्द अभिनेत्री पूजा रायबागी हिचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला आहे. 

पूजाने आपल्या साखरपुड्याचे फोटो सोशल मिडीयावर चाहत्यांशी शेयर केले आहेत.

पूजा रायबागीने अभिनेता प्रसाद डबकेसोबत साखरपुडा केला आहे. प्रसाद हा स्टार प्रवाहवरील ऐतिहासिक मालिका जय भवानी जय शिवाजी या मालिकेत झळकला होता. गोपीनाथ पंत बोकील ही भूमिका त्याने साकारली होती. 

पूजा आणि प्रसाद यांची जबरदस्त केमिस्ट्री या फोटोंमधून दिसून येते.  

साखरपुड्याच्या या खास फोटोशूटवर चाहते आणि मित्रवर्गाकडून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

 

Recommended

Loading...
Share