By  
on  

अप्सरा एन्जॉय करतेय पोर्तुगालमध्ये सुट्टी, पाहा फोटो

सेलिब्रिटींचा झगमगाट जेवढा पाहताना छान वाटतो तेवढाच त्यांना यासाठी स्वत:चा भरपूर वेळ द्यावा लागतो, हेसुध्दा आपल्याला माहिती आहे. सुट्टी म्हणजे सेलिब्रिटींसाठी एक पर्वणीच ठरते. आपल्या सहज-सुंदर अभिनयाने आणि सौंदर्याने संपूर्ण सिनेसृष्टीला भुरळ पाडणारी अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या आपल्या बिझी शेड्यूलमधून काही निवांत क्षण एन्जॉय करतेय. पोर्तुगालमध्ये ती सुट्टीसाठी आली आहे. तिथल्या विविध नयनरम्य ठिकाणांचा मनमुराद आनंद ती घेत आहे.

या मस्ट नीडेड ब्रेकबद्दल खुद्द सोनालीनेच आपल्या सोशल मिडीय नेटवर्कींग साईटवरुन याची माहिती दिली. पोर्तुगाल येथील डोम लुईस ब्रीज येथील स्वत:चा एक फोटो तिने शेअर केला आहे. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये सोनाली फारच सुंदर दिसतेय, सोनाली या फोटोला कॅप्शन देत म्हणतेय,“मी स्वच्छंद प्रवासी आहे.”

विविध आकर्षक ठिकाणं, विविध पदार्थ यांचा आस्वाद घेत सोनाली मस्त प्रवास करतेय. सोनालीने पोर्तुगाल येथील रोमन कॅथलीक चर्च पोर्तो कॅथ्रेडलच्या दरवाज्याजवळ एक फोटो पोस्ट करत हे चर्च पोर्तुगाल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून अतिशय सुंदर असल्याचे म्हटले आहे.

सिनेसृष्टीतल्या या अप्सरेला सुट्टयांचा आनंद घेण्यासाठी पिपींगमून मराठीतर्फे सोनालीला ‘हॅप्पी हॉलिडे’!

Recommended

PeepingMoon Exclusive