'आई कुठे काय करते' मधील या अभिनेत्रीला मिळाली दाक्षिणात्य सुपरस्टारसोबत काम करण्याची संधी

By  
on  

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे स्टार प्रवाह वरील 'आई कुठे काय करते'. या मालिकेत सतत नवनवे ट्विस्ट येत असतात. यामुळेच ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवते. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा रसिक प्रेक्षकांंच्या पसंती उतरतेय.मालिकेत विशाखाची म्हणजेच लाडक्या विशाखा आत्याची  भूमिका साकारणारी अभिनेत्री पूनम चांदोरकरला एक मोठी संधी मिळाली आहे. पूनम दाक्षिणात्य सूपरस्टार विजय सेतुपतीसोबत दिसणार आहे.

पूनमने इन्स्टाग्रामवरून एक  पोस्ट केली आहे. हा फोटो शेअर करत तिने विजय सेतुपतीसोबत काम करणार असल्याचे म्हटले आहे. पूनमने विजय सेतुपतीसोबत हा फोटो शेअर केला आहे.  ती लिहते, “तुमचं मन तुम्हाला सांगतं की हे अशक्य आहे, पण ते शक्य होतं. तमिळ सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत काम करणं हा माझ्यासाठी एक सुखद धक्का आहे. हे सगळं तुमच्या आशीर्वाद आणि प्रेमामुळे शक्य झालं.”

 

पूनमची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Recommended

Loading...
Share