By  
on  

Lata Mangeshkar Health Update : लतादीदींच्या आरोग्याविषयी ही महत्त्वपूर्ण माहिती आली समोर

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांना करोनाची लागण झाल्याचे काल समोर आले. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्या 92 वर्षांच्या आहेत. त्यांचं वयोमान लक्षात घेता खबरदारी म्हणून त्यांच्यावर रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. देशभर लतादीदी लवकरात लवकर ब-या व्हाव्या यासाठी प्रार्थना सुरु आहेत. 

इ टाइम्सने दिलेल्या  माहितीनुसार, लता मंगेशकर यांना कोरोनासोबतच निमोनिया झाला आहे. त्यांच्यावर डॉक्टर्सची खास टीम उपचार करत आहे. त्यांना काही दिवसांपूर्वीच हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. परंतु काल अर्थातच मंगळवारी ही बातमी बाहेर आली आहे. त्यांचे चाहते सतत त्यांच्या हेल्थ अपडेट्स मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

लता दीदींची भाची रचना शाह यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, लतादीदींमध्ये करोनाची सौम्य लक्षणं आढळली आहेत. खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर डॉक्टरांची टीम उपचार करत आहे. लतादीदी या सध्या ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. पुढील काही दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive