'माझा होशील ना फेम' सई म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडे करोना पॉझिटीव्ह

By  
on  

सध्या संपूर्ण जग पुन्हा एकदा करोनाच्या संकटाचा सामना करत असून नव्या आव्हानांचा सामना करत आहे.अनेक कलाकारसुध्दा करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय मालिका 'माझा होशील ना' ची नायिका गौतमी देशपांडे हिला करोनाची लागण झाली आहे. सोशल मिडीयावरुन गौतमीने आपल्याला करोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे. 

गौतमीने इन्स्टाग्राम स्टोरीर लिहलं आहे, दोन लसींचे डोस घेऊनही मला करोनाची लागण झाली आहे, तुम्हीसुध्दा करोनाला अजिबात हलक्यात घेऊ नका. योग्य ताी सर्व खबरदारी घ्या. घरी रहा, सुरक्षित रहा, 

गौतमीची प्रमुख भूमिका असलेली 'माझा होशील ना' ह मालिका प्रचंड गाजली. तिच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 

Recommended

Loading...
Share