By  
on  

सुमीत रीघवन म्हणतो, 'दुकानांची नावं मराठीत लिहून काय होणार? '

राज्य सरकारने नुकताच एक महत्त्वपूर्ण आदेश संपूर्ण राज्यासाठी जारी केला आहे. सर्व दुकाने आणि आस्थापनांमध्ये मराठी भाषेत ठळक अक्षरात नामफलक लावणं सक्तीचं केलं ाहे. यावरुन राजकीय वादंग तर पेटलाच आहे, परंतु सर्वच स्तरांतून यावर विविध प्रतिक्रीया सध्या उमटताना दिसतायत. मनोरंजन विश्वातूनसुध्दा अनेक कलाकार यावर आपलं मत मांडत आहेत. परंतु अभिनेता सुमित राघवन याने केलेलं ट्विट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 

मराठी पाट्यांना सक्ती करून खरंच काही फरक पडणार आहे का? असा प्रश्न त्यानं त्यानं विचारला आहे. 'याचा खरंच काही फायदा होणार आहे का? मराठी शाळा वाचवा, पालकांनी त्यांच्या मुलांना मराठी शाळेत घालावं , यासाठी प्रोत्साहन द्या. आज काल सर्व मराठी शाळा इंग्रजी माध्यमात बदलत आहेत. हा निर्णय म्हणजे बॉम्बेला मुंबई करण्यासाखं आहे.

बोर्ड,फलक मराठीत लिहून 'मराठी अस्मिता' जपली जात नाही. आतून बदल घडला पाहिजे. जे दुरापास्त वाटतंय, असंही त्यानं म्हटलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive