विशाल निकम म्हणतो, 'सर्व गोष्टी सुरळीत झाल्यावर स्वत:हून सौंदर्याचं नाव सांगेन, प्लीज धीर धरा'

By  
on  

बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन प्रचंड गाजला. यात आपुलकीने व प्रेमाने वागणारा, प्रसंगी आक्रमक होणारा अभिनेता विशान निकमने सीजन ३च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं . अभिनेता विशाल निकम हा बिग बॉस मराठी 3 चा स्पर्धक घरात अनेक कारणांनी चर्चेत राहिला. कधी वाद-विवादामुळे तर कधी धम्माल-मस्ती, प्लॅंनिग यामुळे. पण सध्या तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. 

विशाल बिग बॉसच्या घरात असताना त्याच्या सौंदर्याबद्दल बरीच चर्चा झाली. तर फॅमिली वीकमध्ये त्याची आई भेटायला आली तेव्हा त्याने वडिलांच्या आठवणीत आईला आणखी एकाला फोन कर असे म्हटले. तू तिला फोन कर, तिच्याशी बोल असं विशाल म्हणताच त्याच्या आईने ‘सौंदर्याचे’ नाव घेतले ती म्हणाली सौंदर्याचा फोन आला होता , बहिणही तेच म्हणाली. है ऐकून विशालचा चेहरा खुप खुलला . मात्र तिच्याबाबत अधिक खुलासा करण्यास त्याने आईला थांबवले. ‘तिच्याबद्दल सांगायला अजून वेळ आहे’. 

बिग बॉसच्या घरात पहिल्या काही आठवड्यांमध्ये विशाल हा एकटाच सौंदर्याशी बोलताना पाहायला मिळाला आहे. त्यामुळेच विशालची ही सौंदर्या कशी आहे, कशी दिसते, कशी बोलते आणि ती विशालची गर्लफ्रेंडच आहे का हे जाणून घेण्याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला लागली.

म्हणूनच विशालने चाहत्यांना एक नम्र विनंती केली आहे. 

 

 

“मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, योग्य वेळ आल्यावर आणि काही खासगी गोष्टी सुरळीत झाल्यावर स्वत:हून सौंदर्याचं नाव सांगेल. ती एक सामान्य मुलगी असून, अभिनयसृष्टीशी तिचा काही एक संबंध नाही. त्यामुळे इंडस्ट्रीतील कोणत्याही व्यक्तीसोबत माझं नाव कृपया जुळवू नका! कारण यामुळे विनाकारण त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो हे लक्षात घ्या आणि प्लीझ धीर धरा…मला थोडा वेळ द्या,” अशी विनंती विशालने चाहत्यांना केली आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अनेक नेटकऱ्यांनी विशाल निकमच नाव अभिनेत्री अक्षया हिंदळकरसोबत जोडलं होतं. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात होते व हीच सौंदर्या असे पसरवले होते. परंतु ती त्याची नायिका होती, दोघांनी साता जन्माच्या गाठी या मालिकेत एकत्र काम केले होते.  म्हणून विशालला ही विनंती करावी लागली. 

Recommended

Loading...
Share